

भुईंज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी सातारा जिल्ह्यतील भुईंज-बदेवाडी येथे शिवशाही बस (एमच 06 ईडब्लल्यू 3523) जळून खाक झाली. यामध्ये तब्बल 40 प्रवासी होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी झाली नाही. शिवशाही बसचा टायर खराब झाल्याने बसने पेट घेतला.
कोल्हापूर येथून पुण्याला जाणार्या या बसच्या डाव्या बाजूच्या टायरने पेट घेतला. महामार्गावरून येणार्या प्रवाशांनी याची माहिती बस चालकाला दिली. यामुळे चालकाने बस रस्त्याकडेला घेत सर्व प्रवाशांना उतरवले. टायर पेटल्यानंतर अर्ध्या तासातच आगीने रौद्ररूप धारण केले. किसन वीर कारखाना व वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने बसची आग आटोक्यात आणली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.