

सातारा : राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची अनेक बिले थकीत आहेत. ही बिले काढण्यासाठी थोडा विलंब होत आहे. मात्र, लवकरच या थकीत बिलासंदर्भात तातडीने मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तात्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कामे मंजूर केली होती. मात्र ठेकेदारांना पैसे देताना विलंब होत आहे ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत बिले दिली नाहीत, असे झाले नाही. मार्चपर्यंत नवीन सरकारने 10 हजार कोटीची बिले दिली आहेत. पुढच्या निधीबाबत तरतूदी केल्या आहेत. लवकरच ही बिले संबंधितांना दिली जातील.
शासकीय बिलांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालून आहेत. ते लवकरच यातून मार्ग काढतील. कंत्राटदाराची थकीत असलेली बिले त्यांना दिली जातील असेही ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.