Shivendraraje Bhosale | विरोधकांचे मुंगेरीलाल के हसीन सपने : ना. शिवेंद्रराजे

महायुतीचे दोन्‍ही उमेदवार मताधिक्‍क्‍याने विजयी होतील
Shivendraraje Bhosale
Shivendraraje bhosalePudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : महाविकास आघाडीच्या नेत्यांची मानसिकता पराभवाचीच झाली आहे. तरीही ते दिवास्वप्न पहात आहेत. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. आपल्या अवाक्याबाहेरच्या अपेक्षा बाळगण्यात महाविकास आघाडीचे नेते वेळ घालवत आहेत, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांवर केली.

सातारा शहरातील विविध मतदान केंद्रांच्‍या भेटीप्रसंगी त्‍यांनी प्रसार माध्‍यमांशी संवाद साधला. ना. शिवेंद्रराजे म्‍हणाले, महायुतीच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे. मतदानाच्या ठिकाणी मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. निवडणुकीनंतर महायुतीचे दोन्ही उमेदवार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील प्रश्‍न सोडवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार पुढील कार्यकाळात शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील.

एकीकडे तरुणांनी राजकारणात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करायची आणि दुसरीकडे तरुणांना संधी मिळाल्यानंतर त्यांच्या वयावरून टीका करायची, ही महाविकास आघाडीची भूमिका दुटप्‍पी आहे. एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता, काम करण्याची तयारी आणि प्रश्‍न सोडवण्याची क्षमता महत्त्वाची असते.

केवळ वयाच्या मुद्द्यावरून टीका करणे योग्य नाही. पदवीधर व शिक्षकची निवडणूक गोकुळसारखीच होईल, या टीकेवर ना. शिवेंद्रराजे म्‍हणाले, गोकुळ दूध संघाची निवडणूक ही कोल्हापूर जिल्ह्यातील स्वतंत्र निवडणूक होती. गोकुळच्या निवडणुकीत पाच हजार मतदारांचा सहभाग होता. त्या निवडणुकीचा निकाल आणि विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची निवडणूक यांची थेट तुलना करणे चुकीचे आहे. गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना बहुमताला कमी मते मिळाली असली, तरी ते विजयी झाले, हे नाकारता येणार नाही.

मात्र, गोकुळमध्ये एकतर्फी विजय मिळाला होता, असे चित्र नव्हते. गोकुळसारख्या मर्यादित मतदारसंख्येच्या निवडणुकीतील निकालावरून पाच जिल्ह्यांतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा अंदाज बांधणे कितपत योग्य आहे? असा सवालही त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news