Shivendraraje Bhosale | हद्दवाढ भागाच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य : ना. शिवेंद्रराजे भोसले

विलासपूर परिसरातील पदयात्रेत जनतेशी संवाद
Shivendraraje Bhosale | हद्दवाढ भागाच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य : ना. शिवेंद्रराजे भोसले
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरासह हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या विलासपूर, शाहूनगर आणि परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नवीन योजना मंजूर केल्या आहेत. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून सरकारच्या माध्यमातून सातारा शहराच्या विकासासाठी भरीव कामे होत आहेत. आगामी काळातही विविध विकास योजना राबवून संपूर्ण शहराचा आणखी कायापालट घडवण्यासाठी सातारकरांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते व पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

सातारा नगरपालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अमोल मोहिते व भाजप नगरसेवक पदाचे उमेदवार फिरोज पठाण, पूनम निकम यांच्या प्रचारार्थ झालेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी अमोल मोहिते व पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह सर्व आजी - माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मी व खा. उदयनराजे भोसले साताऱ्याच्या सर्वांगिण विकासाचा आरखडा राबवत आहोत. त्या अनुषंगाने विविध कामे गतीने मार्गी लावली जात आहेत. सातारकर ही सगळी कामे अनुभवत आहेत. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना सातारकरांनी भक्कम साथ द्यावी. विकासकामांचा अजेंडा राबवणारा सर्वसमावेशक चेहरा म्हणून अमोल मोहिते यांना संधी देण्यात आली आहे. साताऱ्याच्या विकासाचा आराखडा मार्गी लावताना अमोल मोहिते कुठेही कमी पडणार नाहीत. यापूर्वीही अमोल मोहिते यांच्या विकासाभिमुख वाटचालीची झलक शहरवासियांनी बघितली आहे. त्यामुळे नागरिकांनी अमोल मोहितेंच्या पाठीशी राहून भाजपला ताकद द्यावी, असेही ना. शिवेंद्रराजे म्हणाले.

फिरोज पठाण यांनी विलासपूर परिसरात हद्दवाढीत येण्याच्या आधीपासून विकासकामांचा झपाटा लावला आहे. जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हाही आणि हा परिसर नगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतरही या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथील जनता पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे, असेही ना. शिवेंद्रराजे म्हणाले.

अमोल मोहिते म्हणाले, ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून साताऱ्याने विकासाचा नवा लूक परिधान केला आहे. झपाट्याने होत असलेल्या कामांमुळे सातारा राज्यात आयडॉल ठरु लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news