सातारा : अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 25 लाख रुपये देणगी दिली आहे. सातारा येथे 1993 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची मागणीही अजिंक्यतारा कारखान्याच्या लेटरहेडवर स्व. भाऊसाहेब महाराज यांनी केली होती. आज 32 वर्षांनी साताऱ्यात साहित्य संमेलन होत असून अजिंक्यतारा साखर कारखान्याने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील आपले योगदान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, असे प्रतिपादन ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 25 लाख रुपये मदतीचा धनादेश ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते आदी उपस्थित होते. यावेळी ना. शिवेंद्रराजे यांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.