

सातारा - साताऱ्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला आहे.
शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातून हा महोत्सव अनेक वर्षांपासून घेतला जातो आहे.
हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त अजिंक्यतारा किल्ल्यावर आले होते.
मान्यवरांच्या हस्ते गड पूजन करून या मशाल महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.