Shashikant Shinde: ‘त्या‌’ सभापती महिलेस 10 कोटी दिले

आ. शशिकांत शिंदेंचा आरोप : म्हणाले, भीतीच उरली नाही
Shashikant Shinde
Shashikant Shinde
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून लता कर्णे यांना 10 कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, संबंधितांना पक्षाच्या कारवाईची भितीच उरली नसल्याचेही ते म्हणाले.

सातारा जि. प. विषय समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीमध्ये भाजपने लोकशाहीचा खून केला आहे. विषय समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीच्या कर्णे या सभापती झाल्या आहेत. 10 कोटी रुपये त्यांना देण्यात आले आहेत. लोकांना आपण अपात्र होऊ किंवा आपल्यावर पक्ष कारवाई करेल, अशी काही भीतीच राहिली नाही.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, वाईचे विराज शिंदे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. त्यांच्याच घरातील सुरेश जाधव जे काँग्रेसमधील मोठे नेते होते. अशा घराचा वैचारिक वारसा देखील यांनी जपला नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी एक याचिका आम्ही दाखल केली आहे. लवकरच त्यांना अपात्र करण्यासाठी ना. शंभूराज देसाई देखील याचिका दाखल करतील, अशी माहिती देखील आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार भेटत आहेत का? या माध्यमांच्या प्रश्नावर आ. शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटत आहेत, याबाबत माझ्याकडे काही माहिती नाही. बारामती पोटनिवडणुकीबाबत आम्ही भूमिका जाहीर केली आहे. आमचा पक्ष तिथं निवडणूक लढणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news