Share market fraud: शेअर मार्केटच्या आमिषाने 71 लाखांची फसवणूक

फसवणूक केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल
Share market fraud
Share market fraudfile photo
Published on
Updated on

सातारा : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून सुमारे 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

श्वेता सिंग, मुकुंद कोचर या दोघांविरुद्ध नितीन विष्णू निकम (वय 50, रा. देगाव रोड, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित दोन्ही आरोपींनी ड्रीम जर्नी क्लब या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. संशयितांनी तक्रारदार यांच्या नातेवाईकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला फायदा देतो, असे सांगितले.

त्यानुसार तक्रारदार यांच्या नातेवाईकांनी संशयितांना वेळोवेळी एकूण 70 लाख 88 हजार रुपये बँक खात्यावर पाठवले. मात्र संशयितांनी जास्त परतावा व मूळ रक्कम दिली नाही. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसांत तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news