

सातारा: पुढारी वृत्तसेवा: दुष्काळी परिस्थितीमुळे बीड, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांचे चहरे सुकले आहेत. तरुण अस्वस्थ आहेत. त्याचप्रमाणे माण तालुक्याचीही परिस्थिती आहे. या जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे, त्यांची आहे. मात्र, त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला सरकार तयार नाही. जो कष्टकरी, शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येतो, त्याला आमचा पाठिंबा नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सरकारला फटकारले.
आज (दि.२५) खासदार शरद पवार माण तालुक्याच्या दौर्यावर आले होते. बारामतीहून ते वाहनाने फलटणमार्गे दहिवडी येथे पोहोचले. दरम्यान, फलटण येथे महाविकास आघाडीच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ते दहिवडीकडे रवाना झाले. मोगराळे घाटातून पवार यांची माण तालुका युवक राष्ट्रवादीने जल्लोषी रॅली काढली.
दहिवडी येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा