Satara News : शैक्षणिक गुणवत्तेत सातारा झेडपी राज्यात द्वितीय

गुणवत्तेच्या कामावर केंद्राची मोहर : राज्यासह देशभरात नावलौकिक
Satara Zilla Parishad
सातारा जिल्हा परिषद
Published on
Updated on

सातारा : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सन 2024-25 च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला. सातारा जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर केंद्र सरकारची मोहर उमटली आहे. झेडपीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे राज्यासह देशभरात नावलौकिक होत आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक ही मूल्यमापन प्रक्रिया शुक्रवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्याने मागच्या दोन वर्षापेक्षा तब्बल 63 गुण जादा मिळवले. मागील वर्षापासून मराठी भाषेच्या वाचन लेखन तसेच गणिताच्या सर्व गणितीय क्रिया, इंग्रजीच्या वाचन लेखन संभाषण या कौशल्यासाठी केलेले विशेष प्रयत्न माझी शाळा सुंदर शाळा या जिल्ह्यातील विशेष उपक्रमांतर्गत शाळेमध्ये झालेल्या भौतिक सुविधा तसेच गुणवत्ता विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, शिक्षकांनी अध्ययन अध्यापन मध्ये केलेले बदल, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी या क्षत्रिय यंत्रणेने केलेले वस्तुनिष्ठ काम यु डायस ची प्रभावी अंमलबजावणी यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हे यश मिळवले आहे.

या सर्व अभिनव उपक्रमांची दखल घेऊन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि शैक्षणिक वातावरणात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले. या कार्याची दखल घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचे मानले जाणारे मानांकन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news