Satara News: जिल्ह्यात झेडपी, पं. स. मतदार यादी कार्यक्रम सुरू

जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची माहिती तयार करण्यात येणार
Satara News |
Satara News: जिल्ह्यात झेडपी, पं. स. मतदार यादी कार्यक्रम सुरूPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची माहिती तयार करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांचे काम सुरू झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार यादीचे काम सुरू केले आहे. यासाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या मतदार संख्येनुसार याद्या फोडण्यात येणार आहेत. कोणती गावे कोणत्या गटात व गणात आहेत याची मााहिती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मदररोल तयार करणे, कंट्रोल चार्टमध्ये माहिती भरण्याचे काम सुरू झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news