Satara ZP: जि.प. अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची अफवा

सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याची अफवा शुक्रवारी पसरली
Satara ZP
Satara ZP Pudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याची अफवा शुक्रवारी पसरली. त्यानंतर अनेकांनी आपल्या व्हॉटस्‌‍ॲप स्टेटसवर या निवडीचा बोगस कार्यक्रम ठेवला. सोशल मीडियावर या कार्यक्रमाची पोस्ट व्हायरल झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली.

याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता अजून कार्यक्रम जाहीर झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल दि. 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यानंतर 19 दिवस उलटले तरीही जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच 11 पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम लावण्यात आलेला नाही. नुकताच शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 20 मार्चपूर्वी या निवडी करण्याचे आदेश काढले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अशातच शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे एक बोगस निवड कार्यक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाला. दि. 9 मार्च रोजी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी दि. 16 मार्च रोजी होणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली. परंतु, अधिकाऱ्यांनी असा कोणताही कार्यक्रम जाहीर केला नसल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news