Satara ZP: राष्ट्रवादीच्या फुटीरांना सभापतिपदाची लॉटरी

शिवसेना - राष्ट्रवादीचा निवडीवर बहिष्कार; भाजपचा ‌‘चौकार‌’
Satara ZP
Satara ZPPudhari
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडीतही ड्रामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फोडून भाजपने या निवडीवर झेंडा रोवला. राष्ट्रवादीचे ऋतुजा विराज शिंदे व लता कर्णे हे दोन सदस्य फुटले असून भाजपने त्यांची सभापतिपदी वर्णी लावली. चारही सभापतिपदे बिनविरोध करत भाजपने वर्चस्व राखले.

या निवडीवर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकत सभात्याग केला. काळ्या फिती लावून सभागृहात आलेल्या या सदस्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. गेटवरच आम्हाला रोखले, फॉर्म भरू दिला नाही असा आरोपही या सदस्यांनी केला. शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदी भाजपच्या तेजस्विनी कदम, कृषी-पशुसंवर्धन समिती सभापतिपदी राष्ट्रवादीच्या लता कर्णे, महिला व बालकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे, तर समाजकल्याण समिती सभापतिपदी ऋषीकेश धायगुडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी राडा झाला होता. त्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळापर्यंत उमटले होते. त्यामुळे विषय समिती सभापती निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. भाजपच्या सदस्यांची रणनीती कास पठारावरील हेरिटेजवाडीत ठरली होती, तर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांची खलबते हॉटेल प्रीतीवर झाली होती. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी या निवडीसाठी जमावबंदी आदेश लागू केला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी या निवडीला प्रारंभ झाला. झेडपी आवारात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news