

सातारा : महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडील मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंडळ, स्वारगेट येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सातारा जिल्हा परिषदेचा राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पंचायत विकास निर्देशांकमध्ये राज्यातील प्रथम 10 जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती व राज्यस्तरावरील टिमचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 9 व्या स्थानावर सातारा जिल्हा परिषद असल्याने ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सीईओ याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसर्या स्थानावर असणार्या मान्याचीवाडीचे सरपंच रविंद्र माने यांना मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले.