Satara News : पहिल्या सभेबाबत झेडपीत उत्सुकता

विविध समिती सदस्यांच्या होणार निवडी
Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishad
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीच्या ड्राम्यानंतर शुक्रवारी दुपारी 2 वाजता पहिली विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा वादळी होणार का?, विरोधकांची भूमिका काय राहणार? याबाबत जि.प. वर्तुळात उत्सुकता आहे. या सभेत विविध समित्यांसाठी सदस्यांच्या निवडी होणार आहेत.

जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना या सभेसाठी आपल्या विभागाचा लेखाजोखा घेऊन बसावे लागणार आहे. अध्यक्षांना स्थायी व जलसंधारण समितीचे सभापतिपद तर उपाध्यक्षांकडे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापतिपद देण्यात येणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष व सभापतींना विषय समित्यांचा पदभार सोपवणे. विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे, विभागप्रमुखांना विषय समित्यांचे सचिव म्हणून निवड करणे आदी 3 विषय चर्चेला ठेवले आहेत.

निवडीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

या सभेत सर्व विषय समिती सदस्यांच्या निवडी होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यासंदर्भात त्यांना निवडीबाबत विशेष प्रशिक्षणही दिले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड व विषय समिती सभापतीच्या निवडीवेळी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, कृषी समिती, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, अर्थ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, आरोग्य, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीच्या अनुषंगाने ही विशेष सभा होणार आहे. या निवडीसाठी विस्तार अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक 1 तर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक 2 म्हणून निवड केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news