Satara ZP: सातारा झेडपीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका वाजला
Satara ZP: सातारा झेडपीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
Published on
Updated on

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका वाजला आहे. त्यामुळे शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

शनिवारी मलबार हिल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गुणांकन करताना आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम, ज्येष्ठता सूची, पदोन्नती, सरळसेवा भरती, बिंदू नामावली, अनुकंपा भरती, आय गोट प्रशिक्षण, सेवापुस्तक या घटकांच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागाकडून सातारा जिल्हा परिषदेचे गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये 80 पैकी 80 गुण जिल्हा परिषदेस मिळाले. त्यामुळे राज्यात आदर्शवत, असे काम सातारा जिल्हा परिषदेचे झाले.

या विशेष मोहिमेंतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषद कार्यालयामधून सातारा जिल्हा परिषदेने प्रथम स्थान मिळवले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. गौरवाबद्दल प्रशासनाचे अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले व जि. प. सदस्यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news