Satara ZP Teacher Recruitment : झेडपीकडून ३३४ शिक्षकांना नियुक्ती आदेश

मंगळवारपर्यंत सुमारे १०० टक्के शिक्षक शाळेवर हजर होतील
Satara ZP |
Satara ZPPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फत आलेल्या सुमारे ३३४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत नियुक्ती आदेश दिले आहेत. शिक्षकांच्या शाळावर हजर होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मंगळवारपर्यंत सुमारे १०० टक्के शिक्षक शाळेवर हजर होतील.

जिल्हा परिषदेंतर्गत पवित्र पोर्टलवर भरतीसाठी सुमारे ५२० रिक्त पदांचा अहवाल भरला होता. त्यापैकी ३५७ शिक्षकांची निवड यादी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाली होती. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पडताळणी समिती स्थापन केली होती. भरतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली.

मात्र, कोणत्या तालुक्यात नवीन शिक्षक द्यायचे यावरून पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली त्यामुळे ऐन पावसाळ्यात झेडपीमध्ये वातावरण तापले होते. शेवटी काही मुद्यावर पदाधिकारी व अधिकाऱ्यामध्ये पुन्हा चर्चा झाल्यानंतर शिक्षकांच्या पदस्थापनेची प्रक्रिया पार पडली. जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुमारे २०२ उपशिक्षक व १३२ पदवीधर शिक्षक असे मिळून ३३४ शिक्षकांना नियुक्तीपत्रे दिली असल्याची माहिती शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी दिली. सर्व शिक्षक शनिवारपासून शाळेत हजर होऊ लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news