Satara News : झेडपी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दिमतीला नव्या गाड्या

नवीन गाड्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत
Satara News : झेडपी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दिमतीला नव्या गाड्या
Published on: 
Updated on: 

सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला आता ९ नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या नवीन गाड्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे तालुका व गावपातळीवर दौरे वाढणार आहेत.

सातारा जिल्हा परिषदेचे महिला, समाजकल्याण, कृषि, शिक्षण व अर्थ समिती सभापतीं, खंडाळा, कोरेगाव पंचायत समित्यांचे सभापती व गटविकास अधिकारी, जावली पं.स.चे गटविकास अधिकाऱ्यांची वाहने जुनी झाली होती. तसेच या वाहनांनी किलोमीटरची मर्यादाही ओलांडली होती. त्यामुळे ही वाहने कुठेही बंद पडत होती. त्यामुळे प्रशासनाने ही वाहने निर्लेखीत केली.

त्यानंतर ही वाहने खरेदी करण्यासाठी शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनामार्फत प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कोट्यवधी रूपयांच्‍या ९ नव्या स्कार्पिओ खरेदी करण्यात आल्‍या. त्यानंतर या वाहनांच्या चाव्या संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेत शुक्रवारी वाहनांचे प्रातिनिधीक स्वरूपात पूजन करून वाहने त्या त्या पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांच्या ताब्यात प्रशासनामार्फत देण्यात आली.

ऐन दुष्‍काळात कोट्यवधी रूपयांचा चुराडा

एकीकडे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे शाळांच्या इमारती, आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत प्रश्‍न प्रलंबित असताना दुसरीकडे पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी कोट्यावधी रूपये खर्च करून नवीन वाहनांची व्यवस्था केली जात आहे. वाहनांची गरज असली तरी त्यांची खरेदी करताना आर्थिक शिस्त, काटकसर आणि सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग याचा विचार होणे गरजेचे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.