

Manganga River Incident Palashi Youth Swept Away
सातारा: माण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने पळशी येथील नवनाथ पाटोळे हा तरुण रात्री पात्रातून वाहून गेला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम आज (दि.२८) सकाळपासून म्हसवड नगरपालिकेचा अग्निशमन विभाग आणि ग्रामस्थ यांच्या मार्फत सुरू आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
दरम्यान, बारा तास उलटून गेले तरीही एनडीआरएफ ची टीम पोहोचली नाही. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.