Satara kidnapping case: मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणातून युवकाचे अपहरण

लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण
kidnapping case
kidnapping casePudhari Photo
Published on
Updated on

कोरेगाव : मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरून किन्हई येथील युवकाचे अपहरण करून त्याला लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार हरिचंद्र जाधव (वय २४, रा. किन्हई, ता. कोरेगाव) असे अपहरण झालेल्‍या युवकाचे नाव असून त्‍यानेच पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. ८ जून रोजी मध्यरात्री किन्हई गावच्या हद्दीतील पुलावर प्रसाद हणमंत सुतार, तन्मय हणमंत सुतार आणि जयकर टिवले (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. किन्हई) यांनी संगनमत करून केदार जाधव यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेले.

श्रद्धाशी का बोलतो? या कारणावरून संशयितांनी केदार याला लाकडी दांडक्याने व लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news