सातारा : देवदर्शनाला जाताना पत्नी ठार; पती गंभीर

आरफळ कॉलनी परिसरातील घटना
Satara Accident News
देवदर्शनाला जाताना अपघातFile Photo
Published on
Updated on

कोरेगाव : रहिमतपूर ते तारगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी एक दाम्पत्य चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले होेते. ते आरफळ कॉलनी परिसरात आले असता त्यांच्या दुचाकीला अचानक रस्त्यावर आलेल्या दुसर्‍या दुचाकीने धडक दिली. यामध्ये या दाम्पत्याची दुचाकी बोलेरोवर आदळून अपघात झाला. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत रहिमतपूर पोलिस ठाण्यात सुरू होते.

सौ. कांचन भरत जाधव असे ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती भरत शंकर जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. किरोली, ता. कोरेगाव येथून भरत व कांचन हे दोघे रहिमतपूर येथील चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. रहिमतपूर ते तारगाव रस्त्याने जात असताना ते आरफळ कॉलनी परिसरात आले. त्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीची धडक बसली. यामध्ये भरत यांची दुचाकी होलपडून पाठिमागून येत असलेल्या बोलेरोवर जावून आदळली. या अपघातात कांचन यांचा बोलेरोखाली आल्याने मृत्यू झाला. तर भरत जाधव हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे किरोली गावावर शोककळा पसरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news