Satara News: लिंबखिंडजवळ पाण्याचा टँकर चाेरणार्‍यांना अटक

पाण्याचा टँकर चोरीच्या गुन्ह्याचा एलसीबीने एका दिवसात छडा लावत १३ लाख रुपये किमतीचा चोरीचा टँकर जप्‍त करून दोघांना अटक केली
Satara News: लिंबखिंडजवळ पाण्याचा टँकर चाेरणार्‍यांना अटक
Published on
Updated on

सातारा : पाण्याचा टँकर चोरीच्या गुन्ह्याचा एलसीबीने एका दिवसात छडा लावत १३ लाख रुपये किमतीचा चोरीचा टँकर जप्‍त करून दोघांना अटक केली. अनिकेत लकडे (वय २५, रा. पाडेगाव, ता. फलटण), शुभम जैस्‍वाल (१८, रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी संशयितांची नावे असून, साथीदारांचा शोध सुरू आहे.

२६ जुलै रोजी मौजे पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राच्या कार्यालयाजवळ पार्किंगमध्ये पाण्याचा टँकर अज्ञाताने चोरून नेला होता. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एलसीबीचे पोनि विश्वजित घोडके यांना गोपनीय माहिती मिळाली की, सातारा शहरालगत लिंबखिंड येथे दोघेजण निळ्या-पांढऱ्या रंगाचा टँकर विक्रीसाठी ग्राहक शोधत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक लिंबखिंड येथे पाठवण्यात आले.

सातार्‍यात पकडला टँकर...

पोलिसांनी टँकरबाबत विचारणा करून कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने पाडेगाव येथून हा टँकर चोरी केल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news