Satara Water Crisis : सातारा जिल्ह्यात ५९ गावे, ३२२ वाड्या तहानल्या

५२ टँकरने पाणीपुरवठा : टंचाईचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांचे हाल
Satara Water Crisis
Satara Water CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील ५९ गावे व ३२२ वाड्यामधील ७९ हजार ६४५ नागरिक व ६४ हजार ९४७ जनावरांना ५२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कडक उन्हामुळे जिल्ह्यात आणखी टँकर वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहीरी, नदी, नाले, बंधारे, ओढ्यातील पाणीसाठा घटू लागला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना दररोज पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सध्या कडक ऊन पडत असल्याने पाण्याचे टँकर अजून गावोगावी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात माण तालुक्यात बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, शिरताव, कारखेल, धूळदेव, भाटकी, पर्यंती, हवालदारवाडी, पिंगळी बु., मार्डी, इंजबाव, भालवडी, खुटबाव, विरळी, कुरणेवाडी, शेनवडी, बनगरवाडी, पानवण, वरकुटे मलवडी, वारूगड, परकंदी, टाकेवाडी, सुरूपखानवाडी, शिंदी बु., कोळेवाडी, उकीर्डे, महिमानगड, दोरगेवाडी , कुकुडवाड, पुकळेवाडी यासह ४५ गावे व २६९ वाड्यामधील ६४ हजार ४५४ नागरिक व ५८ हजार जनावरांना ४४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यात मोराळे, मरडवाक, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमरवाडी, तडवळे, डाभेवाडी, गारवडी (आवळेपठार), पडळ, पळसगाव यासह ११ गावे व ५१ वाड्यामधील १३ हजार ४१७ नागरिक व ६ हजार ६६७ जनावरांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, गोळेगाव, गोळेवाडीअशा ३ गावे व २ वाड्यामधील १हजार ७७४ नागरिक व २८० जनावरांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्यस्थितीत ११ विहीर व १० कूपनलिका प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.