Mahabaleshwar temperature: महाबळेश्वरचे तापमान 35 अंश सेल्सिअसवर

थंड हवेचे ठिकाण असणारे महाबळेश्वरही तापले
Temperature
Temperature Pudhari
Published on
Updated on

सातारा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा चढू लागला आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने अवघे जनजीवन होरपळू लागले आहे. उकाडा व घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सोमवारी थंड हवेचे ठिकाण असणारे महाबळेश्वरही तापले आहे.

महाबळेश्वरचे तापमान 35 वर, तर साताऱ्याचे तापमान 40.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सलग तिसऱ्या दिवशी तापमान चाळीशीपार गेल्याने सातारकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वाढते ऊन व उष्म्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता घेण्याची गरज वाढली आहे.

उन्हाचा चटका वाढल्याने सकाळी 8 वाजता घामाच्या धारा वाहत आहेत. उन्हामुळे घराबाहेर पडणे मुश्कील होत असल्याने भर दुपारी रस्ते ओस पडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news