Satara water cut: साताऱ्यात उद्यापासून पाणीकपात

कास व शहापूर योजनेतून दिवसाआड पाणी; वितरण व्यवस्थेवर ताण
Water Cut
Water Cut(Pudhari File Photo)
Published on
Updated on

सातारा : साताऱ्यास पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाक्या भरून घेण्यास विलंब होत आहे. तीव्र उन्हाळ्याचा फटका दोन्ही योजनांना बसत असल्याने तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने दोन्ही योजनांचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. ही पाणीकपात दि. 15 रोजीपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.

सोमवारी भैरोबा टाकीतून केला जाणारा शुक्रवार पेठ, गडकर आळी परिसरास पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी बोगदा परिसर, पॉवर हाऊस, व्यंकटपुरा पेठ, धननीची बाग, करंडबी नाका परिसर, सकाळ सत्रातील पोळवस्ती, पॉवरहाऊस झोपडपट्टी व चिमणपुरा पेठ; बुधवारी मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा काही भाग, ढोणे कॉलनी; गुरुवारी भटजी महाराज मठ, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार, पद्मावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर, धस कॉलनी, दस्तगीर परिसर;

शुक्रवारी संत कबीर सोसायटी, पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ काही भाग, गारेचा गणपती, मनामती चौक काही भाग, नागाचा पार, संत कबीर सोसायटी व पोळवस्ती (निळी लाईन) काही भाग; शनिवारी शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेववाडी झोपडपट्टी परिसर; रविवारी अदालतवाडा परिसर व माची पेठ, बोगदा परिसर व खापरी लाईनवरील बोगदा ते बालाजी अपार्टमेंट परिसर, कांबळे वस्ती व जांभळे वाडा परिसर, जंगी वाडा व गोल मारुती परिसर ते राजवाडा लाईन परिसरास पाणीपुरवठा होणार नाही.

शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपुरवठ्यातही कपात केली आहे. सोमवारी मल्हार पेठ, बडेकर वस्ती, ढोर गल्ली, नकाशपुरा, शनिवार पेठ परिसर, रविवार पेठ, लोणार गल्ली, कैकाड गल्ली ते मरिआई कॉम्प्लेक्स, जगताप कॉलनी, पंताचा गोट, खंडोबा माळ, वडार वस्ती, बडेकर वस्ती, कांबळे वस्ती परिसर; मंगळवारी कुंभारवाडा, कोलाट वस्ती, चारभिंती ते कूपर कारखाना बैठ्या टाक्यांची घंटेवारी; बुधवारी समर्थ मंदिर चौक ते हत्तीखाना, सोमवार पेठ, बागवान गल्ली, दैवज्ञ मंगल कार्यालय ते न्यू इंग्लिश स्कूल कोपरा, झंवर शाळा ते खडकेश्वर शाळा, महात चौक, विष्णू आळी, सोन्या मारुती चौक परिसर; समर्थ मंदिर काही भाग, स्टेट बँक कॉलनी ते विश्वेश्वर मंदिर, मंगळवार पेठ; गुरुवारी पिसाळ आर्केड परिसर, शाहू गार्डन पिछाडी, घोरपडे कॉलनी ते केसरकर पेठ, सूर्यवंशी वस्ती, जुना दवाखाना भाग, शिर्केशाळा परिसर, शनिवार पेठ काही भाग, खणआळी, लंबे बोळ;

शुक्रवारी करंजे, शेंडे कॉलनी, बाबर कॉलनी, एकता कॉलनी, निसर्ग कॉलनी, बुधवार नाका ते बारटक्के चौक परिसर; शनिवारी राजलक्ष्मी टॉकीज पिछाडी, शेटे चौक परिसर, नालबंद वाडा परिसर ते खड्डा मशीद, कोतवालवाडा परिसर, औंधकर घर पिछाडी, दत्तमंदिर ते कमानी हौद चौक, राजसपुरा पेठ, दुर्गा पेठ; रविवारी तांदुळ आळी, मोती चौक ते देवी चौक ते शनिवार चौक, गोरक्षण बोळ परिसर, औंधकर मळा, राधिका चौक परिसर या भागास पाणीपुरवठा होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news