Satara Accident: वाकेश्‍वर-बावधन येथील अपघातात पोलिस ठार

आईचे औषध आणण्‍यासाठी जाताना दुर्घटना; पत्‍नीही गंभीर
Accident
Accident
Published on
Updated on

वाई : आईला पॅरालिसिस झाल्‍याने वाईहून सातार्‍याकडे औषध आणण्‍यासाठी निघालेल्‍या पोलिसाचा अपघातात मृत्‍यू झाल्‍याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. श्रवण राठोड असे ठार झालेल्‍या वाई ठाण्‍यातील पोलिस हवालदाराचे नाव आहे. या अपघातात श्रवण यांची पत्‍नी रंजना ऊर्फ पिंकू राठोड याही गंभीर जखमी झाल्‍या. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्‍यात झाली आहे.

श्रवण यांच्‍या आई गेले दोन महिने आजारी होत्या. त्‍यांना शुक्रवारी रात्री पॅरालिसिसचा अटॅक आल्‍याने आईसाठी पॅरालिसिसचे औषध आणण्‍यासाठी वाईच्‍या डीबी पथकात असणारे श्रवण राठोड व पत्‍नी रंजना हे दोघे शुक्रवारी रात्री सातार्‍याकडे निघाले होते. त्‍यांची कार बावधन गावाच्‍या हद्दीत आली असता समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्‍यांना धडक दिली. या धडकेत श्रवण हे गंभीर जखमी झाल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. शेजारी बसलेल्‍या रंजना याही गंभीर जखमी झाल्‍या. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे.

श्रवण राठोड हे २०१७ च्‍या बॅचचे असून पाच वर्षांपासून वाई पोलिस ठाण्‍यात कार्यरत होते. श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ, धाडसी पोलीस अंमलदार म्हणून त्यांची ओळख होती. शनिवारी या अपघाताची नोंद पोलिस ठाण्‍यात झाल्‍यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्‍थळाच्‍या सीसीटीव्‍ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news