Wai Fire Incident: वाईत आगीत फुटवेअरचे दुकान खाक

वाई शहरातील चित्रा टॉकीज परिसरातील गणपती आळी येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मधू फुटवेअर या चप्पल-बूट शोरूमला अचानक भीषण आग लागली
Wai Fire Incident
Wai Fire IncidentPudhari
Published on
Updated on

वाई : वाई शहरातील चित्रा टॉकीज परिसरातील गणपती आळी येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मधू फुटवेअर या चप्पल-बूट शोरूमला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झाला असून अंदाजे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चित्रा टॉकीजजवळील मधू फुटवेअर या दुकानासह शेजारील लावपान टपरीलाही अचानक आग लागली. पहाटेच्या वेळी धूर व ज्वाळा दिसताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच नगरपालिका अग्निशमन विभाग आणि वाई पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील चप्पल, बूट व अन्य साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news