Satara Police : वाईतील एपीआय प्रदीप जाधव निलंबित

होमगार्ड मारहाण प्रकरणाची माहिती वरिष्ठांना न देता घटना दडपण्याचा प्रयत्‍न केल्याचा ठपका
Suspended
Suspended
Published on: 
Updated on: 

वाई : होमगार्ड मारहाण प्रकरणाची माहिती वरिष्ठांना न देता घटना दडपण्याचा प्रयत्‍न केल्याचा ठपका ठेवत वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ही कारवाई केली.

या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या निलंबन आदेशात तक्रारी परस्पर मिटवणे, गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी आणि महिला तक्रारदार तसेच महिला पोलीस अंमलदारांशी गैरवर्तन केल्याचेही आरोप करण्‍यात आले आहेत. वाई येथे कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला मारहाण करून गाडीत घालून पळवून नेल्याच्या घटनेतील संशयित जाधव यांना भेटले होते. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे अपेक्षित असतानाही त्यांनी ती दिली नाही. उलट घटना दडपण्याचा प्रयत्न करून गुन्हा दाखल न करता संशयिताला सोडून दिल्‍याचा ठपका ठेवण्‍यात आला आहे.

दरम्यान, जाधव यांच्यावरील कारवाई केवळ होमगार्ड प्रकरणापुरती मर्यादित नाही. डे-ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावताना प्राप्त तक्रारींबाबत प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती न देता त्या परस्पर मिटवण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. याचबरोबर तक्रार देण्यासाठी आलेल्या महिला तक्रारदारांशी तसेच महिला पोलीस अंमलदारांशी उध्‍दट वर्तन केल्‍याने जाधव यांच्‍यावर ही निलंबनाची कारवाई करण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news