Satara Umed Manini Jatra: उमेदच्या मानिनी जत्रेत 32 लाखांची उलाढाल

प्रदर्शनातून बचत गटातील महिलांना मिळाली हक्काची बाजारपेठ
Satara Umed Manini Jatra
Satara Umed Manini Jatra: उमेदच्या मानिनी जत्रेत 32 लाखांची उलाढालPudhari
Published on
Updated on

कराड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजार मैदानावर उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान द्वारा आयोजित मिनी सरस मानिनी जत्रेचा सांगता समारंभ उत्साहात झाला. पाच दिवस भरलेल्या या जत्रेमध्ये शंभर बचत गटांच्या विविध स्टॉलचे 31 लाख 70 हजार 540 रुपये इतकी विक्री झाली.

उमेद अभियाना मार्फत राज्यस्तरावर महालक्ष्मी सरस दरवर्षी आयोजित करण्यात येते. या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या प्रत्येक महिलेला संधी मिळत नसल्यामुळे जिल्हास्तरावर मिनी मानींनी जत्रा आयोजित करण्यात येते. यंदा प्रथमच हा प्रयोग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर कराड येथे करण्यात आला. ग्राहकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा प्रयोग तालुकास्तरावर यशस्वी झाला. या मानिनी जत्रेत सातारा जिल्ह्यातील शंभर बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांबरोबरच शहरी भागातील महिलांनीही प्रदर्शनस्थळी भेट देऊन विविध वस्तूंच्या खरेदी बरोबरच अस्सल गावरान मेजवानीचा मनमुराद आनंद घेतला.

मानिनी जत्रेच्या संयोजनासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार राजे, संजय निकम, स्वाती मोरे, सुरज पवार, तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, शंकर नरबट, तालुका व्यवस्थापक श्रीकांत कुंभारदरे, नीता एडके, प्रभाग समन्वयक, रंजनकुमार वायदंडे, धनंजय पाटील, सुशांत तोडकर, चिन्मय वराडकर, उस्मान मुलानी, माधवी वनारसे, ऐश्वर्या कुंभार, करण जाधव, प्रवीण देसाई, नेताजी पाटील, ओंकार सावंत तसेच गाव पातळीवर कार्यरत असलेल्या ग्राम सखींनी परिश्रम घेतले.

जत्रेचा सांगता समारंभ शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य प्रताप चव्हाण, स्वाती थोरात, तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार, शंकर नरबट, तालुका व्यवस्थापक श्रीकांत कुंभारदरे निता एडके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्वाधिक विक्री करणाऱ्या समूहांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले. श्रीकांत कुंभारदरे यांनी उपस्थित आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news