Satara accident: पारगावजवळ ट्रक उलटला

पुणे-बंगळूरमहामार्गवरील पारगावजवळ मालट्रक उलटल्याने शुक्रवारी पहाटेपासून सुमारे चार तास वाहतूक खोळंबली
Satara accident
Satara accident
Published on
Updated on

खंडाळा : पुणे-बंगळूरमहामार्गवरील पारगावजवळ मालट्रक उलटल्याने शुक्रवारी पहाटेपासून सुमारे चार तास वाहतूक खोळंबली. या अपघातात ट्रकचे तसेच मालाचे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा मालट्रक पारगाव बसस्थानकाजवळ आला असता, उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली होती. याच वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यातच पलटी झाला. अपघातामुळे काही काळ एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवावी लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली. सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

स्थानिकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला काढला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. दरम्यान, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यामुळे या वळणावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news