Satara traffic changes: साताऱ्यात उद्या वाहतुकीत बदल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दि. 15 मे रोजी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकूल वाटप कार्यक्रमासाठी साताऱ्यातील सैनिक स्कूल सातारा येथे येणार आहेत
Traffic Change
Traffic ChangeFile Photo
Published on
Updated on

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दि. 15 मे रोजी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकूल वाटप कार्यक्रमासाठी साताऱ्यातील सैनिक स्कूल सातारा येथे येणार आहेत. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दि.15 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहतुकीकरता बंदी घालण्यात आलेल्या मार्गामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या मार्गावर कार्याक्रमास येणाऱ्या वाहना व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौककडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कनिष्क मंगल कार्यालय बाजूकडून जिल्हा परिषद चौक येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

बांधकाम भवन-आरटीओ ऑफीस, सैनिक स्कूल मेन गेट या मार्गावर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई राहील. सैनिक स्कूल मेन गेट ते जिल्हा परिषद चौक या मार्गावर वाहनांना पार्किंगसाठी मनाई राहणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा बदल करण्यात आला आहे. बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडून सातारा शहरात येणारी सर्व प्रकारची वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजूकडे येतील. पोवई नाका बाजूकडून बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडे जाणारी वाहने ही बांधकाम भवन येथून आरटीओ कार्यालय, कनिष्क मंगल कार्यालय मार्गे बॉम्बे रेस्टॉरंट चौक बाजूकडे रवाना होतील.

कार्यक्रमासाठी पार्किंगबाबत पोलिसांनी असे आवाहन केले आहे की, जुनी एमआयडीसी, कराड, पाटण, कोरेगाव, रहिमतपूर, माण, खटाव बाजूकडून येणारी सर्व वाहने ही जुनी एमआयडीसी मधील महिंद्रा कंपनी पासून जुन्या एमआयडीसीमध्ये रस्त्याच्याकडेला एका बाजुस सरळ रेषेत पार्किंग होतील. जिल्हा परिषद ग्राऊंड-वाई, महाबळेश्वर, मेढा बाजूकडून येणारी सर्व एसटी बसेस या जिल्हा परिषद मैदान येथे पार्किंग होतील. वाढे फाटा- खंडाळा, फलटण बाजूकडून येणारी सर्व वाहने ही जरंडेश्वर नाका सदरबझार, मोना स्कूल, कुपर कॉलनी या परिसरात सर्व्हिस रोडला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news