सातारा : ‘कास’च्या पर्यटकांची बनावट वेबसाईटद्वारे लूट

पुण्याच्या 13 जणांच्या ग्रुपची फसवणूक
Satara Kas Pathar
कास पठारPudhari Photo
Published on
Updated on

बामणोली : जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठाराला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कासच्या नावाची दुसरी एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे समोर आले असून, यातून पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्याच्या 13 पर्यटकांची अशी फसवणूक झाली आहे.

कासवरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आला आहे. या पठाराला देशभरातील विविध पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. त्यासाठी ऑनलाईन बुकिंगचीही सोय करण्यात आली आहे. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन पर्यटकांची लूट केल्याचा प्रकार सुरु आहे. पुणे शहरातील एकूण 13 पर्यटकांच्या ग्रुपने कास पुष्प पठारावरील फुले पहायला येण्यासाठी रविवार दि.22 रोजीचे ऑनलाईन बुकिंग केले होते. हे बुकींग बुधवार दि.18 रोजी सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटे 39 सेकंदानी केले होते. त्याकरता त्यांनी प्रति पर्यटक 150 रुपये प्रमाणे 1950 रुपये प्रवेश शुल्क देखील आकारले होते. तशी त्यांच्याकडे पावती देखील होती. मात्र त्यांनी बुकिंग केलेली वेबसाईट ही अधिकृत कास पुष्प पठाराची वेबसाईट नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

पुण्याच्या या ग्रुपने दाखवलेली पावती कास पठार कार्यकारी समितीच्या कार्यालयातील उपस्थित कर्मचार्‍यांनी पाहिली असता त्या पावतीवर कास पुष्प पठाराची अधिकृत वेबसाईट ऐवजी ज्ञरी.ललरऽळलळलळ असा उल्लेख असल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांनी त्या पर्यटकांना ही वेबसाईट आमच्या समितीची किंवा सातारा वनविभागाने अधिकृत केलेली वेबसाईट नसून आपली दिशाभूल झाली असल्याचे सांगण्यात आले. कास पुष्प पठाराची अधिकृत वेबसाईट ही ुुु.ज्ञरी.ळपव.ळप ही असून पुष्प पठार सुरू झाल्यापासून हंगाम कालावधीमध्ये याच अधिकृत वेबसाईटवर कास पुष्प पठारासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असते. तसेच याच वेबसाईटवरून ऑनलाइन बुकिंग सेवा देखील देश -विदेशातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या पर्यटकांसाठी उपलब्ध आहे.

लूट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होणार

कासच्या नावाखाली ज्यांनी चुकीची वेबसाईट तयार करून पर्यटकांची लुबाडणूक सुरू केली आहे, अशा समाजकंटकांवर सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्यावतीने लवकरच कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे कास पठार कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news