Satara: जिल्ह्यातील ३ शाळांचा देशपातळीवर डंका; स्वच्छ व हरित विद्यालय स्पर्धेत यश

शिक्षण विभागाचे सर्वत्र कौतुक
Clean and Green School
Clean and Green School
Published on
Updated on

सातारा : केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून आयोजित 'स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग २०२५-२६' या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्याने यश पटकावले आहे. या स्पर्धेत पाटण तालुक्यातील ३ शाळांनी देशपातळीवर घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या ८ शाळांपैकी ३ शाळा सातारा जिल्ह्यातील आहेत. या यशामुळे संपूर्ण राज्यात सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कौतुक होत आहे. राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या पाटण तालुक्यातील शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे, पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, पाटण या शाळांनी यश संपादन केले. या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, शाश्वत विकास ध्येये आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या निकषांच्या आधारे शाळांचे मूल्यमापन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना यासाठी कारणीभूत ठरल्या. प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून शाळांना वेळोवेळी भेटी दिल्या आणि आपली शाळा देशात अग्रस्थानी कशी राहील यासाठी मार्गदर्शन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सतीश फरांदे, शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी कानवटे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळांचे जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सभापती ऋतुजा शिंदे, लता कर्णे, ऋषिकेश धायगुडे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्‍यासह मान्‍यवरांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news