

सातारा : सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात एका बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी ७ लाख २ हजार १०८ रुपये किमतींचे सोने व हिऱ्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मनीषा विशाल पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. मोळाचा ओढा येथील बंद घर फोडून चोरट्यांनी दोन तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे मिनी गंठण, सोन्याचे टॉप्स, डायमंड टॉप्स, फॅन्सी कानातील दागिने, सोन्याचे गोठ, बदाम आकाराचे पेंडंट, सोन्याची चैन, डायमंड पदक, डायमंड अंगठी तसेच विविध वजनाची सोन्याची गंठणे या दागिन्यांचा समावेश आहे.
चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ७ लाख २ हजार १०८ रुपये इतकी आहे. ही घटना दि.३१ मे ते दि.४ जून रोजी अभिजात फॅक्टरी जवळ घडली आहे.