Satara Theft: मेव्हणे, मेव्हणे.. चोर निघाले पाहुणे

साताऱ्यातील 22 तोळे सोने चोरी प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील लुटमार प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासासच छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करत 22 तोळ्याच्या सोन्याची रिकव्हरी केली आहे. यामध्ये तक्रारदार व अटक केलेला एक संशयित यांच्यात मेव्हणे व दाजी असे नाते असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही कारवाई पोलिसांनी मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर केली आहे.

अभिषेक शिकलगार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड व अजय राठोड (सर्व रा. मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री साताऱ्यात पोवई नाका येथून पाच जणांच्या टोळक्याने लुटमार करत 22 तोळे सोने जबरदस्तीने चोरुन नेले. साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या ठिकाणच्या जबरी चोरीमुळे पोलिसांची झोप उडाली. रात्री दोन वाजता पोलिसांनी तात्काळ प्राथमिक माहिती घेवून तपासाला गती दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांच्या कारची माहिती मिळाली.

सीसीटीव्ही, टोल नाका या पध्दतीने पोलिसांनी चोरट्यांचा पिच्छा पुरवल्यानंतर चोरट्यांची नेमकी माहिती मिळत गेली. याबाबत सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळवले. यात पांढऱ्या रंगाच्या कारची एका बाजूची काच फुटल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे व चोरटे मध्य प्रदेशात जाण्याची शक्यता व्यक्त झाल्याने धुळ्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी तातडीने चक्रे फिरवत मुंबई-आग्रा महामार्गापासून मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत ठिकठिकाणी सापळे लावून तपासणी केली. शिरपूर तालुक्यात पोलिसांनी एका संशयित गाडीला थांबवण्याचा इशारा केला.

मात्र चालकाने टोल नाका चुकवून शिरपूर गावातील रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस पथकाने पाठलाग करून कारला घेरले. संशयित पाच जणांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी कारमधील संशयित अभिषेक सुरेंद्र शिकलबार, अंकुश जाट, अनुज रामाधर दिवाकर, पंकज केदार राठोड व अजय फौजदा राठोड (रा. सर्वजण मध्य प्रदेश) यांनी साताऱ्यातील दरोड्याची कबुली दिली. साताऱ्यातील 22 तोळे सोने चोरीचा छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश आले. दरम्यान, चोरट्यांना नेमकी माहिती कशी माहिती मिळाली? याची पोलिस माहिती घेत असताना तक्रारदार व चोरट्यातील एक संशयित हे पाहुणे असल्याचे समोर आले. पाहुण्याने पाहुण्यालाच लुटण्याचा प्रकार केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news