Satara News: गॅस वितरक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची लूट

स्वत:च्या नावावर ऑनलाईन घेतले जातात पैसे; ग्राहकांचा आरोप
LPG
LPGPudhari
Published on
Updated on

कोपर्डे हवेली : इराक-अमेरिका युद्धामुळे सध्या पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत चाललेल्या टंचाईमुळे लोक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत घरगुती गॅसच्या टंचाईमुळे ग्राहक गॅस सिलिंडरसाठी चिंतेत आहेत. ग्रामीण भागात या सिलिंडरसाठी लोक दिवसभर रांगा लावून वाट पाहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच गॅस वितरक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांकडे सर्विस चार्जच्या नावाखाली जादा पैशांची मागणी केली जात आहे. हे जादा पैसे कर्मचारी स्वत:च्या खात्यावर ऑनलाईन घेत असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे ‌‘अडला नारायण‌’ अशी स्थिती ग्राहकांची झाली आहे.

वाढत्या गॅस टंचाईमुळे आज ग्राहकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा गाडी गावात येते अशा परिस्थितीत आपल्याला सिलिंडर कधी मिळेल?, नक्की मिळणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे गॅस मिळणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखी आजची परिस्थिती आहे.

याच संधीचा फायदा घेत गॅस वितरक कर्मचारी ग्राहकांकडून सर्विस चार्जच्या नावाखाली जादा पैशांची मागणी करत आहेत. केवळ मागणीच नव्हे तर ते पैसे स्वत:च्या खात्यावर ऑनलाईन घेत आहेत. ग्राहकही एकदा सिलिंडर पाठीमागे गेला तर पुन्हा कधी मिळणार? मिळेल की नाही? यामुळे गॅस वितरण कर्मचाऱ्यांकडून जरी जादा पैशांची मागणी झाली तरी सध्याचा सिलिंडर गॅसच्या टंचाईमुळे ग्राहक जादा पैसे देत आहेत. याच परिस्थितीचा फायदा कर्मचारी घेत आहेत.

गॅस सिलिंडर वितरण कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांकडे सर्व्हिस चार्जच्या नावाखाली जादा पैसे मागितले जात असल्याचे तक्रारी आहेत. ज्या रकमेची पावती आहे, तिच रक्कम द्यावी. सर्व्हिस चार्ज हा पावतीवर असलेल्या रकमेतच आकारलेला आहे. तसेच सिलिंडर घेताना ग्राहकांनी ओटीपी नंबर आलेला मेसेज दाखवणं गरजेचं आहे. परंतु जर तो मेसेज ज्या फोनच्या नंबरवर आला आहे. तो फोन त्यावेळी उपलब्ध नसेल तर तो ओटीपी नंबर सिलिंडरवर टाकून कार्ड आणि नंबर दाखवून सिलिंडर घ्यावा.
- संग्राम जाधव, गॅस डिलर एजन्सीज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news