Satara Murder Case : सातार्‍यात शिक्षक बापाकडून मुलीचा खून

व्‍यसनामुळे पालक होते त्रस्‍त; समजून सांगताना वाद विकोपाला गेल्याने घटना
Satara Murder Case : सातार्‍यात शिक्षक बापाकडून मुलीचा खून
Published on: 
Updated on: 

सातारा : अवघे १७ वर्षे वय असलेल्‍या मुलीला व्‍यसन लागल्‍याने तिला त्‍यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्‍न करत असताना मुलीनेच वडिलांवर हल्‍ला केला. या घटनेत रागाच्या भरात वडिलांकडून तिचा खून झाला. सातार्‍यातील गोडोलीत ही घटना घडली असून वडील प्राथमिक शिक्षक आहेत. दरम्‍यान, रात्री उशिरापर्यंत गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आर्या (वय १७) असे खून झालेल्‍या मुलीचे नाव असून पुरुषोत्तम कदम (४५, रा. गोडोली, सातारा) शिक्षक असलेल्‍या वडिलांचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. आर्याला गेल्‍या दोन वर्षांपासून चुकीची संगत लागली होती. त्‍यातच तिला व्‍यसनही लागले. यामुळे तिचे आई-वडील दोघे चिंतेत होते. आर्याला समूपदेशन देखील केले. मात्र तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही. अशातच आर्या आई-वडिलांना उलटे बोलणे, फोनवर सतत असणे, व्‍यसन करणे, असे प्रकार करू लागली.

आई-वडील आर्याला समजून सांगत हाेते. शनिवारी रात्री आर्या व वडिलांमध्ये पुन्‍हा वादाला सुरुवात झाली. हा वाद एवढा विकोपाला गेला की आर्याने थेट वडिलांवरच हल्‍ला केला. या झटापटीत वडिलांना राग अनावर झाला व त्‍यातूनच वडिलांनी बॅटने आर्याच्या डोक्‍यात, पायावर मारले. या घटनेत आर्या निपचित पडली. रविवारी सकाळी ही बाब समोर आल्‍यानंतर परिसर हादरून गेला. शहर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा झाल्‍यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये नेला.

प्राथमिक अहवालानुसार डोक्‍यात, भुवई व पायावर मार बसल्‍याचे समोर आले. त्‍यानुसार पोलिसांनी मुलीचे वडील पुरुषोत्तम कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्‍यांनी गुन्‍ह्याची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शिक्षक दाम्‍पत्‍य हतबल...

आर्याचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. या दाम्‍पत्‍याला आणखी एक मुलगा व मुलगी आहे. आर्याला चुकीची संगत व वाईट वळण लागत असल्‍याने तिला कुटुंबीयांनी वेळोवेळी समजावण्याचा प्रयत्‍न केला. मात्र दुर्दैवाने शनिवारी आक्रीत घडले. लहान मुले-मुलांच्या संगती व त्‍यांच्या सवयीमुळे समाजमन सुन्‍न होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news