Satara ZP Election : सातारा तालुक्यात सरासरी 61 टक्के मतदान

72 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद : कृष्णानगर, पाटखळमध्ये तणाव
Satara ZP Election
सातारा तालुक्यात सरासरी 61 टक्के मतदान
Published on
Updated on

सातारा : सातारा तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणांसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने सुमारे 61 टक्के मतदान झाले. गटाचे26 व गणांचे 46 मिळून 72 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांनी मशीन बंद केले. मतदानावेळी कृष्णानगर, पाटखळ येथील मतदान केंद्रांवर वादावादी झाली. त्यातून दोन गट आमनसामने आले. दरम्यान, हे प्रकार वगळता मतदान सुरळीत पार पडले. तालुक्यातील 371 मतदान केंद्रावर 2 लाख 80 हजार 351 मतदारांपैकी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 1 लाख32 हजार 175 मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळपर्यंत सुमारे 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सातारा तालुक्यातील पाटखळ, लिंब, नागठाणे, खेड, कोडोली, कारी, शेंद्रे, वर्णे, परळी, अतित, नेले, शिवथर, आरफळ, मालगाव, वडूथ, बोरखळ, वाढे, देगाव, कोंडवे, धावडशी, कण्हेर, रामनगर, वर्ये, म्हसवे, काशिळ, पाडळी, निनाम यासह सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर काही मतदान केंद्रावर तूरळक गर्दी दिसून आली तर शहरालगत असणाऱ्या मतदान केंद्रावर नगरसेवकांसह अन्य राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. सर्वच मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी गर्दी कायम होती. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुमारे 61 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अशिष बारकूल यांनी दिली. सायंकाळी 3.30 पर्यंत पाटखळ गटातील 42 मतदान केंद्रात 36 हजार 831 मतदारांपैकी 18 हजार 578 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 50.44 टक्के मतदान झाले. पाटखळ गणात 16 हजार 714 मतदारांपैकी 9 हजार 8 तर शिवथर गणात 20 हजार 117 मतदारांपैकी 9 हजार 570 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लिंब गटातील 54 मतदान केंद्रात 40 हजार 699 मतदारांपैकी 18 हजार 674 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला गटात 45.88 टक्के मतदान झाले. लिंब गणात 19 हजार 482 मतदारांपैकी 10 हजार 357 तर कोंडवे गणात 21 हजार 217 मतदारांपैकी 8 हजार 317 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खेड गटातील 37 मतदान केंद्रात 31 हजार 876 मतदारांपैकी14 हजार 806 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 46.45 टक्के मतदान झाले. खेड गणात 15 हजार 866 मतदारांपैकी 6 हजार 716 तर क्षेत्रमाहुली गणात 16 हजार 010 मतदारांपैकी 8 हजार 90 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोडोली गटातील 35 मतदान केंद्रात 31 हजार 528 मतदारांपैकी 11 हजार 913 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 37.79 टक्के मतदान झाले. कोडोली गणात14 हजार 954 मतदारांपैकी 6 हजार 51 तर सभांजीनगर 16 हजार 574 मतदारांपैकी 5 हजार 862 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारी गटातील 73 मतदान केंद्रात 33 हजार 895 मतदारांपैकी 17 हजार 179 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 50.68 टक्के मतदान झाले. परळी गणात 16 हजार 369 मतदारांपैकी 7 हजार 933 तर कारी गणात 17 हजार 526 मतदारांपैकी 9 हजार 246 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेंद्रे गटातील 43 मतदान केंद्रात 32 हजार 742 मतदारांपैकी16 हजार 749 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 51.15 टक्के मतदान झाले. निनाम गणात 16 हजार 732 मतदारांपैकी 8 हजार 956तर शेंद्रे गणात 16 हजार 10 मतदारांपैकी 7 हजार 793 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

वर्णे गटातील 50 मतदान केंद्रात 41 हजार 100 मतदारांपैकी 19 हजार 374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 47.14 टक्के मतदान झाले. वर्णे गणात 19 हजार 177 मतदारांपैकी 8 हजार 986 तर अपशिंगे गणात 21 हजार 923 मतदारांपैकी 10 हजार 388 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागठाणे गटातील 37 मतदान केंद्रात 31 हजार 680 मतदारांपैकी 14 हजार 902 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गटात 47.04 टक्के मतदान झाले. नागठाणे गणात17 हजार 28 मतदारांपैकी 8 हजार 29 तर अतित गणात 14 हजार 652 मतदारांपैकी 6 हजार 873 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सातारा तालुक्यातील 371 मतदान केंद्रावर 2 लाख 80 हजार 351 मतदारांपैकी 1 लाख 32 हजार 175 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5.30 पर्यंत सरासरी 61 टक्के मतदान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह आमदार व अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

सातारा तालुक्यासह मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, तहसिलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक अमोल तांबे, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सर्वच मतदान केंंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मतदान केंद्रावर वादावादीचे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करुन शांतता राखण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news