Satara crime: दारुला लागणारे ‘स्‍पिरीट’ जप्‍त संशयित लाेणंद, पुण्याचा

एक्‍साईजची कारवाई
Satara crime: दारुला लागणारे ‘स्‍पिरीट’ जप्‍त संशयित लाेणंद, पुण्याचा
Published on
Updated on

सातारा : महामार्गावरील शेंद्रे, ता.सातारा येथे राज्य उत्‍पादन शुल्‍क विभागाने (एक्‍साईज) सापळा रचून बेकायदेशीर दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे मद्यार्क (स्पिरीट) पकडले. याप्रकरणी लाेणंद ता.खंडाळा व पुणे येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मेहुल संदिप पाटील (वय ३१, रा.इंदिरानगर, लोणंद ता. खंडाळा), व सुरज चंद्रकांत आटके (वय ३२, रा. धनकवडी ता. हवेली जि.पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. सातारा एक्‍साईज विभागाला दारु बनवण्यासाठी लागणार्‍या स्‍पिरीटची वाहतूक होत असल्‍याची माहिती मिळाली. त्‍यानुसार एक्‍साईज विभागाने सातारा शहरालगत महामार्गावरील शेंद्रे येथे सापळा लावला. एमएच १२ व्‍हीटी १७३३ या क्रमांकाची कार दिसली.

एक्‍साईज विभागाच्या पथकाने दोघांकडे चौकशी करुन वाहनाची तपासणी केली. त्‍यामध्ये ५ लिटर क्षमतेच्या स्‍पिरीटने पूर्ण भरलेल्या प्लास्टिकच्या एकूण ४० दिसल्‍या. हे स्‍पिरीट एकूण २०० लिटर असून त्‍याची किंमत १२ हजार रुपये आहे. चोरट्या पध्दतीने वाहतूक होत असल्‍याने त्‍यावर कारवाई करण्यात आली.

दरम्‍यान, संशयितांची कार देखील जप्‍त करण्यात आली आहे. एक्‍साईजचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, नितीन जाधव, अजित रसाळ, रमेश भुजबळ, विनोद हिंगणे, अमित क्षीरसागर, किरण जंगम, अजित घाडगे, ज्ञानेश्वर मोरे, बाळासो पाचुंदे, जयदीप ननावरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news