Satara burglary cases: चोरट्यांकडून ६ घरफोड्या उघडकीस; १० तोळे सोने जप्‍त

'एलसीबी'ची कामगिरी
Satara burglary cases: चोरट्यांकडून ६ घरफोड्या उघडकीस; १० तोळे सोने जप्‍त
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) कारवाई करत घरफोड्या करणार्‍या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत १० तोळे सोन्या-चांदीचे दागिने, कार, मोबाईल असा एकूण २७ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्‍त केला.

महेश भिमा शिंदे (वय ३२, रा. सांगवी ता. फलटण) असे अटक केलेल्‍या संशयिताचे नाव आहे. सातारा जिल्‍ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मेढा परिसरात झालेल्‍या घरफोडीचा तपास सुरु असताना एलसीबी पथकाला संशयित चोरट्यांबाबत माहिती मिळाली. त्‍यानुसार तांत्रिक तपास करुन संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. संशयिताला अटक करुन न्‍यायालयात हजर केलेे असता त्‍याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्‍यानंतर त्‍याने साथीदारांसोबत अनेक घरफोड्या केल्‍याची कबुली दिली.

या चोर्‍या मेढा, वाई, भुईंज, फलटण ग्रामीण आणि कोरेगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केल्‍या आहेत. एसपी निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, फौजदार परितोष दातिर, पोलिस राजू मुलाणी, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सुजित भोसले, हणंमत भोसले, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, किरण जगताप, रोहित निकम, इरफान मुलाणी, महेश निर्मळ, यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news