Satara News : दुचाकीवरून ४२ गणेश मंडळांना शिवेंद्रराजेंच्या भेटी

रात्री दोनपर्यंत शहरात दौरा : पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी साधला संवाद
Satara News
दुचाकीवरून ४२ गणेश मंडळांना शिवेंद्रराजेंच्या भेटी
Published on
Updated on

सातारा : गणेशोत्सवाच्या उत्साहात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी सातारा शहरातील तब्बल ४२ गणेश मंडळांना दुचाकीवरून भेटी दिल्या. सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला त्यांचा हा दौरा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होता. कोणताही मोठा वाहन ताफा किंवा लवाजमा न घेता मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी शहरातील विविध भागांतील गणेश मंडळांच्या मंडपांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले.

नगरपालिका नगरसेवक व कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी प्रत्येक मंडळाच्या मंडपात थांबून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंडळांच्या उत्सवाचे नियोजन, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती घेतानाच स्थानिक प्रश्नांचीही त्यांनी विचारपूस केली. अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. मंत्रिपदाची जबाबदारी असतानाही कोणताही औपचारिक आविर्भाव न आणता दुचाकीवरून मंडळांना भेटी देत त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांशी थेट संवाद साधला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या दौऱ्यात त्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

logo
Pudhari News
pudhari.news