Satara Murder Case : शेंद्रेत उधारीवरून खून

संशयित सख्ख्ये भाऊ ताब्यात
Murder
MurderPudhari
Published on: 
Updated on: 

शेंद्रे : शेंद्रे, (ता. सातारा) येथे उधारीच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सौरभ बाळू भिसे (वय ३०) असे मृताचे नाव आहे.

प्रमोद किसन जाधव आणि प्रताप किसन जाधव (दोघेही रा. शेंद्रे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित सख्ख्या भावांची नावे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी सौरभ यांच्या डोक्यात खोरे घालून त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सौरभ याची शेंद्रे येथे पानटपरी असून जाधव बंधू हे सोमवारी (दि. २५ सप्टेंबर) सौरभच्या टपरीवर पान मसाला व पान घेण्यास गेले होते. त्यावेळी या दोघांकडे पैसे नसल्याने ते नंतर देतो बोलले. त्यानंतर त्यांनी अद्याप पैसे दिले नाहीत. शनिवारी सायंकाळी जाधव बंधू सौरभ याच्या टपरीवर काही वस्तू घेण्यास आले होते. त्याचवेळी उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून सौरभ आणि संशयितांमध्ये वाद झाल्याचे समजते. या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याने शेंद्रे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तातडीने ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उधारीच्या पैशांच्या वादातून तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया जिल्हा रुग्णालयात सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news