Satara Theft Case : शेंद्रे येथे कंटेनरमधील १ कोटीचे पार्सल्‍स चोरीस

संशयितांकडे कंटेनरमधील संबंधित पार्सल असणारे साहित्‍य पोहोच करण्यासाठी दिले होते
Satara Theft Case : शेंद्रे येथे कंटेनरमधील १  कोटीचे पार्सल्‍स चोरीस
Published on: 
Updated on: 

सातारा : शेंद्रे गावच्या हद्दीतून चौघांनी सुमारे १ कोटी रुपये किमतीचे कंटेनरमधील पार्सल साहित्‍य चोरी केले. याप्रकणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला.

अझरुद्दीन कन्‍नू, फैमुद्दीन हकमुद्दीन, शकील बक्ष, जाबीद मुबीन (सर्व रा. राजस्‍थान) यांच्या विरुध्द नाहीद अकबर खान (वय ३६, रा. हरियाणा) यांनी तक्रार दिली असून, ते दिल्‍लीमधील ज्युपिटर एक्‍स्प्रेस कंपनीचे मॅनेजर आहेत.

ही घटना २० ते २२ नोव्‍हेबर रोजी शेंद्रे गावच्या हद्दीत घडली. संशयितांकडे कंटेनरमधील संबंधित पार्सल असणारे साहित्‍य पोहोच करण्यासाठी दिले होते. मात्र, संशयितांनी कंटेनर लावून साहित्‍य चोरी केले. तसेच अनेक साहित्‍याचे नुकसान केले. संबंधित कंटेनर पोहोचला नसल्‍याने त्‍याची माहिती घेत असताना तो सातारा शहरालगत असल्‍याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.