Satara Motorcycle theft: ‘अवलिया’ दुचाकी चोरास अटक; सराईत रेकॉर्डवरचा गुन्‍हेगार : ४ वाहने जप्‍त

दुचाकी चोरुन दारु पिण्यासह चांगले कपडे, महागडे बूट वापरण्याचा छंद असणार्‍या सराईत रेकॉर्डवरील गुन्‍हेगाराला सातारा शहर पोलिसांनी अटक केली
Satara Motorcycle theft: ‘अवलिया’ दुचाकी चोरास अटक; सराईत रेकॉर्डवरचा गुन्‍हेगार : ४ वाहने जप्‍त
Published on
Updated on

सातारा : दुचाकी चोरुन दारु पिण्यासह चांगले कपडे, महागडे बूट वापरण्याचा छंद असणार्‍या सराईत रेकॉर्डवरील गुन्‍हेगाराला सातारा शहर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्‍याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्‍त केल्‍या.

युवराज आकोबा निकम (वय ५६, रा.पिंपोडे बु.ता. कोरेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सातारा शहरात गेल्‍या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दुचाकी चोरट्यांवर वॉच ठेवून होते. दुचाकी चोरीतील एक सराईत चोरटा वाढे फाटा परिसरामध्ये दुचाकीवरुन जाताना पोलिसांना दिसला. संशयिताचा पाठलाग करून पकडण्यात आले.

संशयिताकडे असलेली दुचाकी विना नंबर क्रमांकाची होती. पोलिसांनी त्‍याबाबत चौकशी केली असता ती चोरी केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी ३ दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. यामध्ये दोन शहर पोलिस ठाण्यातील गुन्‍हे व एक बोरगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्‍हा दाखल आहे.

चौथ्या दुचाकीबाबत पोलिस माहिती घेत आहेत. पोनि सचिन म्‍हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, विकास मोरे, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, अशिकेष डोळस, सचिन आदमाने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news