Satara-Sangli Legislative Council: धैर्यशील कदम, अभयसिंह जगताप दोघांकडून विजयाचा दावा

भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप या दोघांनी विजयाचा दावा केला
Maharashtra Legislative Council Election
Maharashtra Legislative Council ElectionPudhari
Published on
Updated on

सातारा : विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान झाले. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप या दोघांनी विजयाचा दावा केला आहे. येत्‍या २२ तारखेला गुलाल उधळणार, असा ठाम विश्वास दोघांनी व्यक्त केला आहे.

अभयसिंह जगताप म्हणाले, या निवडणुकीमध्ये मतदारांचा मला चांगला प्रतिसाद मिळाला. मतदानासाठी मतदार ट्रीप करून फ्रेश होऊन आले आहेत. ना. मकरंद पाटील आणि ना. शंभूराज देसाई यांचा दुखावलेला सन्मान जीवंत करण्याचे काम मतदार मला मत देऊन करतील. सर्व मतदार माझ्या पाठीशी राहतील, असा माझा विश्वास आहे. राजकीय बंधने असल्यामुळे कोणीही व्यक्त झाले नसले तरी मतदारांचे प्रेम माझ्यावर आहे.

महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना भाजपबरोबर संघर्ष करावा लागला. यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते चिडलेले आहेत. गुर्मीत असलेल्या भाजपने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हिसका दाखवतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news