Satara-Sangli Legislative Council: वाईत आबांची माणसं गठ्ठ्यानं मताला; निर्णायक ठरण्‍यासाठी बांधली एकत्रित मोट

वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यातील सर्व ११० मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला.
Satara-Sangli Legislative Council: वाईत आबांची माणसं गठ्ठ्यानं मताला;  निर्णायक ठरण्‍यासाठी बांधली एकत्रित मोट
Published on
Updated on

वाई : सातारा-सांगली स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विधान परिषद निवडणुकीसाठीसाठी गुरुवारी मतदान झाले. यामध्‍ये वाई प्रांताधिकारी कार्यालयात मतदान झाले. वाई, खंडाळा आणि महाबळेश्‍वर तालुक्‍यातील सर्व ११० मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. यामुळे वाईच्‍या मतदान केंद्रावर १०० टक्‍के मतदान झाले. मकरंदआबांनी सर्व मतदारांची एकत्र मोट बांधत गठ्ठ्याने मतदान करुन घेतले. निकालात निर्णायक राहण्‍यासाठी मकरंदआबांनी घेतलेली ही भूमिका कुतूहलाची ठरणार आहे.

वाई येथील मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदानाचा वेग हा कमी होता. वाई नगरपालिका, महाबळेश्‍वर नगरपालिका, पाचगणी नगरपालिका, लोणंद नगरपंचायत व खंडाळा नगरपंचायतीच्‍या सदस्‍यांचे वाई केंद्रावर मतदान होते. सकाळपासूनच संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारनंतर राज्‍याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे हे तिन्‍ही तालुक्‍यातील राष्‍ट्रवादीच्‍या सर्व सदस्‍यांना सोबत घेत मतदान केंद्रावर दाखल झाले. यानंतर राष्‍ट्रवादीच्‍या सर्व सदस्‍यांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. याचदरम्‍यान वाई पालिकेचे नगराध्‍यक्ष व भाजपच्‍या सदस्‍यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला.

प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी आणि वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्‍या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाई पोलिसांनी मतदान केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संपूर्ण परिसरात दक्षता घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news