सातारा : कुत्र्यांच्या हल्‍ल्‍यात बिथरलेले सांबर थेट छतावरून घरात कोसळले

Sambhar Deer
Sambhar Deer

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसळून जखमी झाले. ही घटना (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. वनविभाग रेस्क्यू टीम पुणे, सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या प्राणीमीत्रांच्या सहकार्याने त्याला उपचारांसाठी पुणे येथे नेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुत्र्याने केलेल्या पाठलागामुळे घाबरलेले सांबर बचावासाठी हरोशी येथील गणपत कोंडीबा उतेकर यांच्या घराबाजूला असलेल्या दरीवरून घराच्या पत्र्यावर चढले. सांबराच्या वजनाने सिमेंटचा पत्रा तुटल्याने ते सांबर थेट घरामध्ये कोसळले. उंचावरून पडल्‍याने ते जखमी झाले.

या सांबाराच्या पायास दुखापत झाल्याने ते उभे राहू शकत नव्हते. अचानक आलेल्या या पाहुण्यास पाहून उतेकर परिवार काहीसा घाबरला. मात्र या घटनेची माहिती तातडीने वनविभाग वनरक्षक बजरंग वडकर, वनमजूर गणेश वागदरे यांना दिली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पुणे रेस्क्यू टीमला जखमी सांबारा बाबतची माहिती कळविली. सायंकाळी रेस्क्यू टीम सह्याद्री प्रोटेक्टर प्राणीमित्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जखमी सांबारास विशेष वाहनाने उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news