Satara RTO: आरटीओमध्ये आता वाहनांची स्वयंचलित तपासणी

अंमलबजावणी सुरू : वाहन फिटनेस तपासणीची जुनी पद्धत होणार बंद
Satara RTO: आरटीओमध्ये आता वाहनांची स्वयंचलित तपासणी
Published on
Updated on
प्रविण शिंगटे

सातारा : व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीत पारदर्शकता, अचूकता आणि वेग आणण्यासाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ऑटोमेटेड टेस्टिंग सुरू करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दि. १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीची संपूर्ण प्रक्रिया आता संगणकीकृत पध्दतीने होणार आहे. वाहन फिटनेस तपासणीची जुनी पध्दत बंद होणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑटोमेटेड टेस्टिंग ट्रॅकचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची खर्च करण्यात आला आहे. हे अत्याधुनिक चाचणी केंद्र हजारो चौरस फुट जागेमध्ये उभारण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक असे प्रशस्त कार्यालयही उभारण्यात आले असून वाहन तपासणीसाठी तीन स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. यापैकी १ ट्रॅक मालवाहतूक व दोन ट्रॅक प्रवासी वाहनांसाठी राखीव आहेत. एका वाहनांची ट्रॅकवर सुमारे १५ ते २० मिनीटे तपासणी यंत्राद्वारे केली जाणार आहे. दिवसाला सुमारे ३०० वाहनांची तपासणी होणार आहे. या सुविधेचा लाभ वाहनधारकांना ऑनलाईन पध्दतीने घेता येणार असून अपॉईंटमेट घेणे बंधनकारक राहणार आहे.

या पध्दतीमुळे तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी होणारा विलंब कमी होण्यास मदत होईल. तसेच मानवी हस्तक्षेप कमी होवून तपासणी अधिक विश्वासर्ह व जलद होणार आहे. तसेच फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन विभागाने पाऊल उचचले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news