Satara News : शाळा व्यवस्थापन पुनर्गठनात सातारा राज्यात अव्वल

जिल्ह्यातील ३४१९ शाळांमध्ये १०० टक्के समित्या गठीत
Satara ZP |
Satara ZPPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पुनर्गठन व पुनर्रचनेच्या प्रक्रियेत सातारा जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित आणि अंशतः अनुदानित अशा तब्बल ३ हजार ४१९ शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांचे गठित करण्याचे काम १०० टक्के पूर्ण करणारा सातारा एकमेव ठरला आहे.

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी मे २०२६ मध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांसंदर्भात नव्या मार्गदर्शिका सर्व राज्यांना पाठवली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावरून सर्व शाळांना शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पुनर्गठनाबाबत सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शिकेतील निकष शाळांना सहज समजावेत आणि प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ज्ञानप्रकाश फाउंडेशनच्यावतीने सोप्या भाषेतील मार्गदर्शिका तयार करण्यात आली. या मार्गदर्शिकेच्या आधारे जिल्ह्यातील शाळांनी समित्यांची पुनर्रचना नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली.जिल्ह्यातील ३ हजार ४१९ शाळांमध्ये नव्या मार्गदर्शिकेनुसार समित्यांची रचना पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने सातत्याने पाठपुरावा केला.

शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पुनर्गठनात १०० टक्के उद्दिष्ट साध्य करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी माध्यमिक शबनम मुजावर, अधिव्याख्याता विजय भिसे, संभाजी कानवटे, ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संदिप जगताप, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.