Satara Rain: पावसाने लटकेवाडी घाटात संरक्षक कठडा कोसळला

ग्रामस्थांची मोठी गैरसोय
Satara Rain: पावसाने लटकेवाडी घाटात संरक्षक कठडा कोसळला
Published on
Updated on

उंडाळे : कराड दक्षिणच्या डोंगरी भागात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कराड दक्षिण मांड नदीवरील टाळगाव येथील पूल पाण्याखाली गेल्याने टाळगावचा बाहेरचा संपर्क तुटला. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. तर लटकेवाडी -संवादे येथे रस्त्यात दरड कोसळली.

कराड दक्षिण मांड नदीवरील टाळगाव येथे गावात मुख्य येजा करण्यासाठी असणारा फरशी पूल यावर्षी प्रथमच पाण्याखाली गेला. त्यामुळे गावाचा संपूर्ण संपर्क तुटला. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. रात्री उशिरा पाणी उतरल्यानंतर संपर्क सुरू झाला. दुसऱ्या. बाजूला मुसळधार पावसाने लटकेवाडी -सवादे गावाकडे जाणाऱ्या घाटातील मुख्य रस्ता दरडी कोसळल्याने कठडा खचला असून याची व रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा गाव संपर्कहीन होईल अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

लटकेवाडी गावात डोंगरातून जाणारा हा मुख्य रस्ता अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या कडेला असणारे दगडी सिमेंट बांधकाम असणारी तटबंदी पाण्याच्या प्रवाहमुळे पडून वाहून गेली आहे. गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. हा रस्ता आणखी खचत जाऊन येण्या -जाण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सदरचा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news